शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

'भाजपाने तर देशभर निवडणूक लढवलीय; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार दीदींनीच घडवला!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 11:59 IST

भाजपा अध्यक्ष अमित शहांचा ममता बॅनर्जींवर घणाघाती हल्ला

कोलकाता: देशात सगळीकडे मतदान शांततेत पार पडलं. फक्त पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार झाला. या हिंसाचाराला केवळ तृणमूल काँग्रेस जबाबदार आहे, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शहांनी तृणमूलवर शरसंधान साधलं. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, अशी टीका शहांनी केली. काल शहांच्या कोलकात्यातील रोड शोमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्यामुळे भाजपाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. यानंतर आज शहांनी पत्रकार परिषद घेत तृणमूलवर शरसंधान साधलं. अमित शहांनी पत्रकार परिषदेत तृणमूलसह राज्यातील निवडणूक आयोग आणि पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. 'तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच आता भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. काल संध्याकाळी भाजपाचा रोड शो होता. त्याआधी तृणमूलच्या गुडांनी भाजपाचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. निवडणुकीपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. पश्चिम बंगालमध्ये तशी कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणूक आयोगानंदेखील यावर आक्षेप घेतला नाही. आयोगाची ही भूमिका दुटप्पी आहे,' अशा शब्दांत शहा बरसले. पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. मात्र राष्ट्रपती शासनाची आवश्यकता नाही. हे शासन जनताच संपवेल, असं अमित शहा म्हणाले. 'अमित शहा काही देव नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणतात. दीदी, मी स्वत:ला देव समजत नाही. पण तुम्हीही समजू नका. कालच्या रॅलीत हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. पण हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितकं कमळ जोमानं फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावं' असं शहा यांनी म्हटलं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा महाविद्यालयातला पुतळादेखील तृणमूलच्या गुंडांनी मोडल्याचा आरोप त्यांनी केला. संध्याकाळी सात वाजता महाविद्यालयातल्या पुतळ्याची कशी काय मोडतोड होते? बंद झालेलं महाविद्यालय कसं काय उघडलं जातं? महाविद्यालयाच्या चाव्या कोणाकडे आहेत?, असे प्रश्न शहांनी उपस्थित केले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिका