शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

'मोदींची चौकशी करा, गांजा तर ओढत नाहीत ना?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 07:16 IST

मोदींच्या 'शराब' विधानावर आपची जोरदार टीका

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या 'शराब' या टिप्पणीवर पलटवार करताना संजय सिंह म्हणाले की, 'मोदींची चौकशी करा. ते गांजा तर   ओढत नाहीत ना? राजकीय पक्षांना शराब, हेरॉईन आणि कोकेन असे तर चौकातील टपोरी नेता बोलू शकतो, पंतप्रधान नाही.' संजय सिंह यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान मोदी काल उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या भाषणावर संजय सिंह यांनी जोरदार टीका केली. मोदींनी तुम्हाला फसवलं. ते इतकं खोटं बोलले की तुम्हीसुद्धा यामध्ये अडकलात, असं संजय सिंह यांनी म्हटलं. सर्वकाही वाईट घडून गेल्यानंतरही मोदी भाजपाला मतदान करा सांगतात, असं म्हणत त्यांनी शोले चित्रपटातील एक प्रसंग सांगितला. 'आम्ही एक सिनेमा पाहिला होता, शोले. त्यामध्ये अमिताभ धर्मेंद्रसाठी बसंतीला मागणी घालण्यासाठी मावशीकडे जातात आणि म्हणतात, धरेंद्र व्यसनी आहे, जुगारी आहे. मात्र हे स्थळ नक्की करा. लग्नाला होकार द्या,' असं संजय सिंह म्हणाले.संजय सिंह यांनी पुढे बोलताना मोदी आणि धर्मेंद्र यांच्या साम्य असल्याचं सांगितलं. 'आपले मोदी दिवस-रात्र खोटं बोलतील. तुम्हाला फसवण्याचं काम करतील. तुमचे खिसे कापतील. महागाई वाढवण्याची घोषणा करतील. पेट्रोल 90 रुपयांनी तर डिझेल 85 रुपयांनी विकतील. दिल्लीत माता-भगिनींना सुरक्षा देणार नाहीत. 15 लाखांच्या नावाखाली खोटी आश्वासनं देण्याचे काम करतील. मात्र, निवडणुका आल्या तर पहिल्यांदा मतदान भाजपाला देण्याची मागणी करतील. त्यामुळे शोलेतील धमेंद्रपासून यावेळी सावध राहा. आपले मोदी शोलेचे धमेंद्र आहेत,' असा टोला त्यांनी लगावला.मेरठमध्ये काल झालेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सपा, बसप आणि आरएलडी या उत्तर प्रदेशातल्या पक्षांची तुलना 'सराब' म्हणजे दारूशी केली. यावर नरेंद्र मोदींवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. 'समाजवादी पक्षाचा 'स', राष्ट्रीय लोकदलाचा 'र' आणि बहुजन समाजवादी पक्षाचा 'ब' या तीन पक्षांची आद्याक्षरे मिळून सराब शब्द तयार होतो. ही दारू तुमचा नाश करेल. उत्तर प्रदेशच्या हितासाठी शराब म्हणजेच दारू चांगली नाही. देशहितासाठी शराब म्हणजेच दारू चांगली नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधलं होतं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी