शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

LMOTY 2020: अनेक भाजप नेते मला खासगीत सांगतात...; देशमुखांनी सांगितली 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 10:38 IST

LMOTY 2020: भाजपकडून देण्यात येणाऱ्या सरकार पडण्याच्या डेडलाईनला देशमुख यांच्याकडून प्रत्युत्तर

मुंबई: महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी होत आला आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पक्षानं सरकार पडण्याच्या डेडलाईन दिल्या. मात्र अद्याप तरी सरकारला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेरोशायरी सादर करताना राज्यात ३ महिन्यांत सत्तापरिवर्तन होईल, असं अप्रत्यक्षपणे सुचवलं. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. विदर्भाच्या दोन नेत्यांमधला कलगीतुरा यानिमित्तानं पाहायला मिळाला. “शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”सुधीर मुनगंटीवार यांनी 'तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा' असं सूचक विधान विधिमंडळात केलं होतं. त्यावर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) भाष्य केलं. राज्यात महाविकास आघाडी सरकारचं सत्तेत आल्यापासून सरकार पडण्याच्या डेडलाईन दिल्या जात आहेत. पण सरकारला कोणताही धोका नाही. आमचं सरकार स्थिर आहे, असा ठाम विश्वास देशमुखांनी व्यक्त केला.तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्यासर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावं लागेल याचा विचार भाजपच्या नेत्यांनी कधीही केला नव्हता. त्यांना सत्तेची स्वप्नं पडत आहेत. पण मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणं त्यांनी बंद करावं. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्ताबदल होईल अशी आस त्यांना लागली आहे. पण तसं काहीही घडणार नाही. आमचे आमदार पळून जाऊ नये म्हणूनच आम्हाला महाविकास आघाडी सरकार पडेल. आपली सत्ता येईल, असे दावे करावे लागतात, असं भाजप नेते आम्हाला खासगीत सांगत असतात, असं देशमुख यांनी सांगितलं.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020