“शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 03:45 PM2021-03-11T15:45:44+5:302021-03-11T15:47:06+5:30

BJP Sudhir Mungantiwar Target Thackeray Government: १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला.

There will change power in State after May 2 BJP Sudhir Mungatiwar warns Shivsena, NCP Congress | “शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”

“शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”

Next
ठळक मुद्देजनहितविरोधी सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालंएखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायचीस्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, पण आमच्या लक्षातच आलं नाही की अशाप्रकारे बेईमानी होऊ शकते

मुंबई – राज्यातील सत्तापालट निश्चित असून जनहितविरोधी सरकार टिकवणं ही सर्वात मोठी घोडचूक आहे असं विधान भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार(BJP Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुनगंटीवारांनी राज्यात ३ महिन्याने सत्तांतर होण्याचा दावा केला होता. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Shivsena MP Sanjay Raut) यांनी मुनगंटीवारांना टोला लगावला होता.

त्यानंतर आता पुन्हा सुधीर मुनगंटीवारांनी पुनरुच्चार केला आहे की, शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं, जनहितविरोधी सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालं, यावेळी ४७ तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रासमोर तयार झाले, १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला.

तसेच एखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायची, आश्चर्य वाटतं, वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही, सरकारी इमारतीत जे भाडेकरू आहेत त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे असं सरकार टिकवणं हे सुद्धा राजकीय दृष्टीने आमच्या हातून सर्वात मोठी घोडचूक आहे, तीन महिन्याचे चार महिने होतील पण हे सरकार टिकवणं घोडचूक आहे. जनतेने महाविकास आघाडी सरकारला निवडून दिलं नाही, जनतेने भाजपा शिवसेनेचे(BJP-Shivsena) १६१ आमदार निवडून दिले. बेईमानी केली, काँग्रेस-राष्ट्रवादीचे(Congress-NCP) ९८ आमदार आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, पण आमच्या लक्षातच आलं नाही की अशाप्रकारे बेईमानी होऊ शकते अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही, जनहितविरोधी राजकारण होत असेल तर शक्तीने लढावं लागेल, तत्परतेने पुढे जावं लागेलच, सूडाचं राजकारण वाढतं तेव्हा सत्तेचा प्रलय नक्कीच होतो, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राती सरकारच्या चूकांचे वजन भरलंय असं समजून चाला, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी २ मेनंतर महाराष्ट्रात राजकीय उलाथापालथ होण्याचा दावा केला आहे.

सरसंघचालकांसोबत भेट अराजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती, परंतु संघचालकाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा दूरान्वये संबंध नाही, संघ देशभक्तीसाठी प्रेरित काम करत असते, त्यांना सगळेच सारखेच आहेत. उत्तम देशभक्त नागरिक निर्माण करण्याचं काम ते करतात. जे देशहिताचं करतात, मग ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल त्यांना सगळेच प्रिय आहेत असंही मुनगंटीवारांनी म्हटलं आहे.

सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात – खासदार संजय राऊत

सरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणारच, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत सरकार अतिशय मजबूत आहे. सरकारचं कामकाज योग्य दिशेनं सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी पुढील साडे तीन वर्ष त्यांचं काम करत राहावं. सरकारची चिंता सुधीर मुनगंटीवार यांनी करू नये, असा टोला लगावला. त्याचसोबत लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. काही निर्मात्यांनी मला मदतीसाठी फोन केले होते. पण मुनगंटीवारांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा चिमटा त्यांनी काढला.  

 

Web Title: There will change power in State after May 2 BJP Sudhir Mungatiwar warns Shivsena, NCP Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.