शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2020: जी-२३ काँग्रेसविरोधी नव्हे; सुशील कुमार शिंदेनी दिला पक्षाच्या इतिहासाचा दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 10:34 IST

LMOTY 2020: इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळातही पक्षात दबावगट होता; शिंदेंनी दिला इतिहासातील संदर्भ

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. त्यावरून पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. मात्र तरीही अद्याप पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळालेला नाही. यावर भाष्य करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नावाला पसंती दिली. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं अशी देशातील तरुणांची इच्छा. काँग्रेस पक्षाला ठेच लागली आहे. त्यामुळे पक्ष आवश्यक सुधारणा नक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) बोलत होते....म्हणून आझादांच्या जागी खर्गेना संधी; सुशील कुमारांनी सांगितलं काँग्रेसचं 'राज'कारणकाही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधील २३ बड्या नेत्यांनी पक्षात निवडणुकीत व्हाव्यात, पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल व्हावेत, अशी मागणी केली. अनेक माजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री असलेला हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. त्यावरही सुशीलकुमार शिंदेंनी भाष्य केलं. जी-२३ गट काँग्रेसविरोधी नाही. पक्षात सुधारणा व्हाव्यात अशीच या गटाची इच्छा आहे. मात्र माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं शिंदेंनी म्हटलं.राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत ही तर देशातील तरुणांची इच्छा- सुशील कुमार शिंदे

काँग्रेसमध्ये विविध सूर असतात, मतमतांतरं असतात. यातून चर्चा होते आणि मार्ग निघतो, असं सांगताना शिंदेंनी इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालावधीत घडलेल्या घटनांची उदाहरणं दिली. इंदिरा गांधी, नेहरूंच्या काळातही पक्षात दबावगट तयार झाला होता. काँग्रेसमध्ये अशा घटना होतच असतात. पण तो गट काही पक्षाच्या विरोधात नसतो. त्यांच्यासोबत चर्चा होणं गरजेचं असतं. जी-२३ प्रकरणही तसंच आहे. माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसनं मल्लिकार्जुन खर्गेंना निवड केली. गुलाम नबी आझाद यांच्या खासदारकीचा कालावधी संपताच काँग्रेस नेतृत्त्वानं त्यांना पुन्हा संधी दिली नाही. यानंतर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. यामागचं राजकारण काँग्रेसचे ज्येष्ठ सुशीलकुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) सांगितलं आहे. सगळ्यांना संधी मिळायला हवी या हेतूनं खर्गेंची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली, असं शिंदे म्हणाले. राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात प्रगल्भ नेत्यांची आवश्यकता असते. त्यामुळेच मल्लिकार्जुन खर्गेंना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. सगळ्यांना संधी देता यावी यासाठीच आझाद यांना दुसरी टर्म दिली गेली नाही, असं शिंदेंनी सांगितलं. काँग्रेसला ठेच लागली आहे. यातूनच सुधारणा होतील. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, ही पक्षातील युवाशक्तीची इच्छा आहे, असं ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020