शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

लिंगायत: राजीव गांधी, अडवाणींसारखी चूक परवडणार नाही; येडीयुराप्पांबाबत भाजपा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 16:29 IST

Karnataka Politics: कर्नाटक ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे.

बंगळुरु: कर्नाटक (Karnataka) ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे. अशा या कर्नाटकात सध्या लिंगायत असा मुद्दा बनला आहे, जो भाजपाला देखील नामोहरम करु शकतो. यामुळे कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाचे वारे असले तरी देखील भाजपाच्या वरिष्ठांना तिथे ताकही फुंकून प्यावे लागत आहे. सध्या मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा (BS yediyurappa) त्या समाजाचे निर्विवाद वर्चस्व असलेले नेते आहेत. (BJP want to take resigne of BS yediyurappa, but histry told lesson to Rajiv Gandhi and LK Advani.)

येडीयुराप्पा फक्त लिंगायतच नाहीत तर अल्पसंख्यांक आणि अन्य समाजाच्या नेत्यांशी देखील चांगले संबंध ठेवलेले नेते आहेत. यामुळे त्यांना त्रास देणे सोपी गोष्ट नाहीय. देशाच्या स्वातंत्र्याआधीही लिंगायत समाजच तिथे प्रबळ होता. 1956 पासून 1969 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसचे विभाजन होईस्तोवर तिथे लिंगायतच मुख्यमंत्री होता. 

राजीव गांधींकडून काय चूक झालेली....इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेसचे नेते आणि पंतप्रधान राजीव गांधींनी एक मोठी चूक केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विरेंद्र पाटील यांना नवी दिल्लीला रवाना होण्याआधीी विमानताळावरून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. यानंतर लिंगायत समाजाची मते भाजपाकडे वळली. या घटनेच्या एक वर्ष आधी पाटील यांनी काँग्रेसला 224 पैकी 184 जागांवर विजय मिळवून दिला होता. या नंतर भलेही काँग्रेस दोनदा सत्तेत आली परंतू महत् प्रयास करूनही लिंगायतांना आपल्या बाजुला आणण्यास काँग्रेस असफल ठरली होती. 

2011 मध्ये भाजपाने ती चूक केली होती. येडीयुराप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास एल के अडवाणी यांनी सांगितले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र, येडीयुराप्पांनी थेट पक्षच सोडत नवा पक्ष स्थापन केला होता. यानंतर आलेल्या 2013 च्या निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. येडीयुराप्पा यांनी 10 टक्के मते खाल्ली होती आणि सहा आमदार निवडूण आणले होते. आता भाजपाला ते पुन्हा करायचे नाहीय. भाजपाने यासाठी येडीयुराप्पांचे वय कारण ठेवले आहे. येडीयुराप्पा 78 वर्षांचे आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे निरोप न दिल्यास लिंगायत समाज दुरावण्याची भीती दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे. यामुळे येडीयुराप्पा भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे, असे राजकीय धुरिणांनी सांगितले आहे. 

येडीयुराप्पांच्या तीन अटी...यासाठी लिंगायत समाजाच्याच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासाठी येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत. 

चार नावे चर्चेत... (Who is next CM of Karnataka)यामुळे सध्या चार नावांची चर्चा आहे. 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. आता भाजपा नेतृत्व येडीयुराप्पांचे लाड पुरविते की यतनाल यांना मुख्यमंत्री करते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी