विधान परिषद पोटनिवडणूक, प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 09:57 AM2021-11-23T09:57:12+5:302021-11-23T09:59:22+5:30

काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी कोल्हापुरातून राज्यमंत्री सतेज पाटील व धुळे-नंदुरबारमधून  गौरव वाणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Legislative Council by-election, unopposed election of Pragya Satav | विधान परिषद पोटनिवडणूक, प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

विधान परिषद पोटनिवडणूक, प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

googlenewsNext

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला होता. भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी अर्ज मागे घेतला. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शक्यतो बिनविरोध निवड व्हावी, असा प्रघात असून ही परंपरा पुढे ठेवावी, अशी विनंती केली होती. 

दरम्यान, काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी कोल्हापुरातून राज्यमंत्री सतेज पाटील व धुळे-नंदुरबारमधून  गौरव वाणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
 

Web Title: Legislative Council by-election, unopposed election of Pragya Satav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.