शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

“तोल सांभाळा! ...अन्यथा राज्याच्या राजकारणातही काँग्रेस कोसळेल”; ‘त्या’ घटनेवरून भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 15:54 IST

बैलगाडी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन न पेलल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच खाली कोसळले.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांसारख्या विषयांवरून भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना, दुसरीकडे इंधनदरवाढ, महागाई, कोरोना लसीकरण यावरून काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. त्यातच मुंबईमध्येकाँग्रेस इंधनरदवाढीविरोधात आंदोलन करत बैलगाडी आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी अपघात होऊन बैलगाडीवरील काँग्रेस नेते खाली कोसळले. यावरून आता भाजपने खोचक टोला लगावला असून, तोळ सांभाळा, असे म्हटले आहे. (keshav upadhye criticize congress over leaders collapses from bullock cart while protesting)

इंधनदरवाढ, महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेसची राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ मोर्चे, आंदोलनांचे आयोजन काँग्रेसकडून केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात बैलगाडी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन न पेलल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच खाली कोसळले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे. 

तसे राज्याच्या राजकारणातही होईल

तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 

“भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

काँग्रेस नेते कोसळले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरोधात जनआंदोलन करण्यात आले. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले. 

“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे बैलगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. तितक्यात बैलगाडी कोसळली. त्यामुळे कार्यकर्ता सिलिंडर घेऊन जमिनीवर पडला. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापBJPभाजपाMumbaiमुंबई