शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

kerala election results : मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांची सुपरफास्ट आघाडी, केरळमध्ये भाजपासाठी जागवला आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 11:10 AM

Kerala Assembly Election Results 2021 : केरळमध्ये आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये केरळमध्ये भाजपाला BJP फार मोठे यश मिळताना दिसत नसले तरी ई. श्रीधरन E. Sreedharan यांनी आपल्या मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. 

तिरुवनंतपुरम - देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करत भाजपाने केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली होती. (kerala assembly election results 2021) आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये केरळमध्ये भाजपाला फार मोठे यश मिळताना दिसत नसले तरी ई. श्रीधरन यांनी आपल्या मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे.  ( Metroman E. Sreedharan lead from Palakkad)

ई. श्रीधरन हे केरळमधील पलक्कड मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या मतदारसंघातील मतमोजणीमध्ये आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाचे ई. श्रीधरन यांना १०  हजार ५५  मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे शफी पराम्बिल यांना ५ हजार ७२२  मते मिळाली आहेत. डाव्या पक्षांचे उमेदवार सी. पी. प्रमोद यांना ३ हजार ९६२ मते मिळाली आहेत. आतापर्यंत मतमोजणी झालेल्या मतांपैकी तब्बल ५०.३६  टक्के मते ही भाजपा उमेदवार ई. श्रीधरन यांना मिळाली आहेत. 

दरम्यान, केरळमध्ये पुन्हा एकदा डाव्या पक्षांची सत्ता येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ या डाव्या आघाडीने ९२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार २ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे. 

केरळमध्ये विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी त्यापैकी ७१ जागांवर विजय मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, डाव्या पक्षांनी आतापर्यंतच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा कधीच ओलांडला आहे. दरम्यान, केरळमध्ये बऱ्याच वर्षांनंतर एक पक्ष आपली सत्ता कायम राखताना दिसत आहे. 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाPoliticsराजकारण