करुणानिधी रुग्णालयात : सुटीवरील पोलिसांना हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 16:27 IST2018-08-07T16:25:55+5:302018-08-07T16:27:13+5:30

रुग्णालयाबाहेर लाखो समर्थकांनी गर्दी केली असून पक्षाचे हंगामी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची भेट घेतल्याने समर्थकांमध्ये संभ्र्माचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Karunanidhi critical : All TN police personnel asked to report to duty | करुणानिधी रुग्णालयात : सुटीवरील पोलिसांना हजर राहण्याचे आदेश

करुणानिधी रुग्णालयात : सुटीवरील पोलिसांना हजर राहण्याचे आदेश

करुणानिधी रुग्णालयात : सुटीवरील पोलिसांना हजर राहण्याचे आदेश
चेन्नई : डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर लाखो समर्थकांनी गर्दी केली असून पक्षाचे हंगामी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची भेट घेतल्याने समर्थकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 स्टॅलिन यांनी पलानीस्वामी यांच्याशी पुढील परिस्थीतीबाबत चर्चा केल्याचे समजते. तसेच करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी व स्मारकासाठी मरिना बीचवर जागा देण्याची मागणी केल्याचेही समजते. यामुळे समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून सुटीवर गेलेल्या पोलिसांनाही ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
करुणानिधी यांना रक्तदाबाच्या त्रासामुळे 28 जुलै रोजी कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Web Title: Karunanidhi critical : All TN police personnel asked to report to duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.