शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 11:59 IST

विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसोनिया गांधी यांचे प्रयत्न कौतुकास्पदकाँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेतकपिल सिब्बल यांनी मांडली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तसेच राजस्थानसह काही ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीनंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावर, विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. (kapil sibal says sonia gandhi initiative to bring oppn unity is commendable)

केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. विरोधकांची एकजूट आहे. २० ऑगस्टला सोनिया गांधी काँग्रेसच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (CM Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेस पक्षातील सुधारणांशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

सोनिया गांधी यांचे प्रयत्न कौतुकास्पद

सोनिया गांधी विरोधकांच्या एकजुटीसाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद तसेच प्रशंसनीय आहेत. मात्र, काँग्रेस पक्षात सुधारणा होत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते आम्ही करत राहणार आहोत. काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा जोश फुंकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून, यात आमचा अडथळा वाटत असेल, तर सोनिया गांधी आम्हांला बाहेरचा रस्ता दाखवू शकतात. परंतु, काँग्रेसला पुन्हा एकदा फ्रंटफूटवर आणण्याचे काम अविरतपणे सुरू राहील, असे कपिल सिब्बल यांनी नमूद केले. काँग्रेस पुन्हा एकदा मजबुतीने उभा राहिला पाहिजे, अन्यथा विरोधकांची कितीही मोठी मोट बांधली, तरी त्याला यश येणार नाही, असेही सिब्बल म्हणाले. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

तोपर्यंत भाजपाविरोधात पर्याय दिला जाऊ शकत नाही

यापूर्वी, या देशातील लोकं आम्हाला प्रश्न विचारत आहेत ते ठीक आहे. आम्ही भाजपविरोधी नाही, पण मग दुसरा पर्याय काय? मला वाटते प्रक्रिया सुरु करण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी एकमेकांशी बोलण्याची वेळ आली आहे. काँग्रेसला या चर्चेतून वगळलेले नाही. राहुल गांधी पुढाकार घेत असून हा डिनर गांधींसाठी आणि गांधीसोबतच होता. राहुल गांधींना योग्य वाटत आहे, त्यापद्धतीने ते करत असून, आम्ही आमच्या परीने शक्य तसा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेसला जोपर्यंत १२० जागा मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपाविरोधात पर्याय दिला जाऊ शकत नाही, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

दरम्यान, आपल्याला देशाचा नाश करणाऱ्यापासून देशाला वाचवायचे आहे. या पक्षाचा १२५ वर्षांचा इतिहास आहे. गेल्या दोन वर्षात पक्षाकडे अध्यक्ष नाही. अध्यक्षांशिवाय पक्षा पुढे कसा जाणार हे मला माहिती नाही. हे कोणाच्या विरोधात नसून पक्षाकडे पूर्णवेळ अध्यक्ष हवा. आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्षही नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. इतका मोठा इतिहास असणारा कोणता राजकीय पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकणार आहे? आम्ही काँग्रेस पक्षासाठी लढत असून आमचा लढा सुरु ठेवू, असे सांगत आम्हाला काँग्रेसला मजबूत करायचे आहे. त्यासाठी काँग्रसने सर्वात आधी कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या इच्छा समजल्या पाहिजेत. देशातील लोकांना भाजप नको असून, आम्हाला त्यांना पर्याय द्यायचा आहे. असे कपिल सिब्बल यांनी यापूर्वी म्हटले होते. 

टॅग्स :Politicsराजकारणkapil sibalकपिल सिब्बलSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस