शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या नामांतरावरून कलगीतुरा; काँग्रेस म्हणतेय 'दुय्यम' तर मनसेचे 'संयम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 07:31 IST

Aurangabad Politics: औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भाजपचे गेली पाच वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई / औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर काँग्रेस नेत्यांचे अधिक प्रेम आणि श्रद्धा असणार, याची मला खात्री आहे, असे सांगून भाजपचे कान टोचले. तर २६ जानेवारीपूर्वी हे नामांतर केले नाही, तर आंदोलन करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली. 

औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भाजपचे गेली पाच वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला. संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्रात भाजपची सत्ता असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.केवळ अग्रलेख लिहून काही होणार नाही, राज्यात तुमचे सरकार आहे. आता औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवा. आम्ही २६ जानेवारीपर्यंत वाट पाहू. नाहीतर, आंदोलन करू, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

नामांतराचा प्रस्ताव दुय्यम : अशोक चव्हाणऔरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याबाबत सरकारकडे कुठलाच प्रस्ताव नाही. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह हे राहणारच; परंतु सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार हे सरकार चालविले जात आहे, असे सांगून सर्व आलबेल असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले. 

 

अहमदनगरचेही नाव ‘अंबिकानगर’ कराशिर्डी : औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचे नावही ‘अंबिकानगर’ करावे, अशी मागणी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. मराठा ठोक क्रांती मोर्चाचे आंदोलनऔरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये जोरदार आंदोलन केले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसे