शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जोडीला मित्रपक्षाचे बळ; तरी दक्षिण मुंबईत काँटे की टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 01:46 IST

भाजपबरोबर बिघडलेले सूर लोकसभेत जुळून आल्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेला बळ मिळाले आहे.

- शेफाली परब-पंडितमुंबई : भाजपबरोबर बिघडलेले सूर लोकसभेत जुळून आल्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेला बळ मिळाले आहे. शिवसेना उमेदवाराला मत म्हणजे मोदींनाच मत, अशी खूणगाठ मनाशी बांधून भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात सामील झाले आहेत, तर काँग्रेसला त्यांचा बालेकिल्ला परत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीही जोमाने कामाला लागली आहे. मात्र, मित्रपक्षाची साथ मिळाली, तरी मतांसाठी शिवसेना-काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे ही लढाई 'काँटे की टक्करच' ठरणार आहे.पालिका निवडणूक २०१७ मध्ये दक्षिण मुंबईतील नऊ वॉर्डांपैकी सात ठिकाणी भाजपने विजय मिळविला. देवरा कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भगवा फडकावण्याचे काम १९९६ आणि १९९९ मध्ये पहिले भाजपने केले, तर २०१४मध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत हे मोदी लाटेमुळे निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची भिस्त भाजपवर आहे. गुजराती, मारवाडी हे भाजपचे पारंपरिक मतदार असल्याने त्यांची मते शिवसेनेकडे वळविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक मैदानात उतरले आहेत.काँग्रेसने आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना साथ देत आहे. या मतदारसंघात तब्बल साडेसहा लाख मराठी मतदार आहेत. ही मते काँग्रेसच्या पारड्यात पडावी, यासाठी मनसेही जोशात प्रचार करीत आहे. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. काँग्रेसकडे मात्र कार्यकर्त्यांचे बळ कमी आहे. अशा वेळी मित्रपक्षातील कुमक ताकद वाढवत आहे. गेल्या निवडणुकीत मोदींना पाठिंबा देणारे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हेदेखील काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करू लागले आहेत. यामुळे धास्तावलेल्या शिवसेनेसाठी भाजप धावून आले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला मित्रपक्षाची साथ आणि त्यांची व्होट बँकही मिळणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातील ही प्रतिष्ठेची लढाई अटीतटीची व अत्यंत चुरशीची ठरणार आहे.भाजपवर भिस्तभाजपने आपली ताकद शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात लावली आहे, परंतु त्यांचे पारंपरिक मतदार यावेळेस शिवसेनेला आपलेसे करणार का, हे मतदानानंतरच स्पष्ट होईल.राष्ट्रवादीशी चांगला ताळमेळमित्रपक्षाबरोबर आमचा ताळमेळ उत्तम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचाही मतदारसंघ दक्षिण मुंबईतच आहे. विकास व प्रचारातही त्यांचा उत्तम सहभाग आहे.- मिलिंद देवरा, काँग्रेससर्व कार्यकर्ते शक्तिनिशी मैदानातप्रचार शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी शक्तिनिशी मैदानात उतरले आहेत. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर सर्व वरिष्ठ नेते मुंबईतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात दिसतील.- सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षशिवसेनेला पूर्ण सहकार्य१०१ टक्के आम्ही एकत्र आहोत. शिवसेना -भाजपचे उमेदवार अरविंद सावंत यांना आमचे पूर्ण सहकार्य असते. ते युतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारात भाजपचे कार्यकर्ते, नेते पुढे आहेत.- मंगलप्रभात लोढा, भाजपमित्रपक्षाचा हिरिरीने प्रचारभाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रचारात पूर्ण सहाकार्य मिळत आहे. प्रचार सभेत, रॅली व प्रभात फेऱ्यांनाही त्यांची हजेरी असते. ते हिरिरीने प्रचार करीत आहेत.- अरविंद सावंत, शिवसेना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-south-pcमुंबई दक्षिणArvind Sawantअरविंद सावंतcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस