शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

"आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही", बैलगाडा शर्यतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 15:19 IST

Ajit Pawar News: आता काही जण बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांचेच सरकार होते. केंद्रात देखील त्यांचीच सत्ता होती. कोणी त्यांना अडवल नव्हतं. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.

बारामती - आता काही जण बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांचेच सरकार होते. केंद्रात देखील त्यांचीच सत्ता होती. कोणी त्यांना अडवल नव्हतं. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी काही करत नाही असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न काहींचा सुरू आहे. कायदा तोडून कोणी स्पर्धा भरवत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार. आम्हाला सुद्धा स्पर्धा घेता येतात. मात्र आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैलगाडा शर्यत मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले.

बारामती येथे शनिवारी (दि. २१) कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, बैैलगाडा शर्यत सुरू व्हावी अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बैैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. राज्य शासनापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार मोठा आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन राज्यशासनाला करावे लागते. बैैल हा प्राणी पाळिव प्राणी न गणला जाता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. हा केंद्र सरकाच्या अखत्यारीतला विषय आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.  कोरोना परिस्थिवर बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, ७०० मेंट्रीक टनापेक्षा जास्त आॅक्सिजन लागल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल. कोरोनाचे सावट दुर व्हावे. तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला सुद्धा वाटते नागरिकांनी देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे मात्र जिथे गर्दी जास्त होते. तेथे कोरोना सक्रमणाची प्रकरणे अधिक अढळून येतात. आषाढी वारी दरम्यान पंढरपूर नजीक पायीवारीला परवाणगी देण्यात आली. त्यानंतर पंढरपूरमध्ये कोरोना संक्रमण वाढल्याचेही दिसून आले. पुणे, पिंपरी-चिंचवड आदी भागामध्ये मागील आठवड्यापेक्षा सध्याचे संक्रमणाचे प्रमाणात बारामती तालुक्यातील कोरोना संक्रमण कमी झाले नाही. मी अधिकाºयांना सुचना दिल्या आहेत. जिएसटी करामधून अ‍ॅम्बुसल वगळण्यात आली आहे. त्यामुळे दोन लाख रूपयांनी अ‍ॅम्बुलसची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने अधिक ५०० अ‍ॅम्बुलस घेतल्या आहेत. वेगवेगळ््या जिल्हा परिषदांमध्ये देखील १४ व्य वित्त आयोगातून अ‍ॅम्बुलस घेण्यात आल्या आहेत. अ‍ॅम्बुलस अभावी कोणत्याही नागरिकाला अडचणीचा सामना करवा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.  पवार साहेबांचा आवाज काढून रेमडेसिव्हीरची मागणी करणाºयांना अटक केली आहे. कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल. अशा पद्धतीने आवाज काढून कोणी फसवत असेल मग तो कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा, गटा-ताटाचा असूद्या त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले. राज ठाकरे हा मुद्दा आमच्यासाठी संपला...उगीच जुन्या कढीला ऊत कशाला आणायचा. या संदर्भात मी बोललो आहे. ज्या लोकांना कुठे थारा राहत नाही. ते अशा प्रकारे बोलातात. आमच्यासाठी तो मुद्दा केंव्हाच संपला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत लवकरच बैैठक... प्रत्येकाला आपला पक्ष संघटना वाढवण्याची मुभा आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास अघाडी सरकार चालवत आहोत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांच्या बाबतीत वरिष्ठ नेते निर्णय घेतात. मात्र नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत जिल्ह्यातील पदाधिकाºयांना आम्ही अधिकार देणार आहोत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि मी आमची एक बैठक नगरपालिका निवडणुकांपूर्वी होईल, त्यामध्ये एकत्र निवडणुकांबाबत ठरवू. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र