शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

युपीएचा विषय केंद्रातला, जिल्हास्तरीय लोकांनी बोलू नये; संजय राऊतांनी दाखवली 'पायरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 11:14 IST

Sanjay raut answer to congress leader nana patoole, sachin sawant: संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असू शकतात. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच लागते असे काही नाही. युपीए हा राष्ट्रीय विषय आहे, असे राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे.

राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे आहे. हे ज्या राज्यस्तरीय नेत्यांना कळत नाही त्य़ांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक, ते देखील यावर चिंतन करत आहेत, असे प्रत्यूत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसच्या (Congress) राज्यातील नेत्यांना दिले आहे. (Sanjay raut answer to congress leader nana patoole, sachin sawant on UPA statement.)

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असू शकतात. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच लागते असे काही नाही. युपीए हा राष्ट्रीय विषय आहे, असे राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे. कधीकधी लूज बॉलला कॅचही मिळतो, विकेटही पडते, असा टोला राऊतांनी विरोधी पक्षनेते संजय राऊत यांनी लगावला आहे. 

ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही 6 महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. पोलिस खात्यातील असे चार-पाच अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा सवाल राऊतांनी व्यक्त केला. बाळासाहेबांनीदेखील अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालविता येत नाही, असे सांगितले होते. युतीसरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेबांनी दोन अधिकाऱ्यांना सुटीवर पाठविण्यास सांगितले होते, असेही राऊत म्हणाले. वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर देवेंद्र फडणवीस ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊतांनी सांगितले. 

ममतांच्या प्रचाराला जाण्य़ाचा विचार...शरद पवार पश्चिम बंगालला जाणार आहेत. माझा विचार आहे जाण्याचा. काँग्रेसने आक्षेप घेतलेला, परंतू पवार हे देशाच्या फायद्याचा त्यांच्या विवेकबुद्धीला पटणारा निर्णय घेतात. यामुळे भाजपाची प्रचार करण्याची पद्धत पाहता ममतांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस