शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

By मोरेश्वर येरम | Updated: January 14, 2021 20:06 IST

विश्वास नांगरे पाटील यांनी आज मुंबईल 'सिल्वर ओक' येथे शरद पवार यांची भेट घेतली.

ठळक मुद्देमुंबईचे सहपोलीस आयुक्त आहेत विश्वास नांगरे पाटीलविश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेटशरद पवारांची भेट घेतल्यानंतर नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबईराज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे याप्रकरणी आता हालचालींना वेग आला आहे. पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

पाहा: धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...

विश्वास नांगरे पाटील यांनी आज मुंबईल 'सिल्वर ओक' येथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे प्रकरणासोबतच आणखी काही विषयांसाठी पवार यांनी नांगरे पाटील यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं सांगितलं जात आहे. 

पवारांच्या भेटीनंतर नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांकडेशरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर विश्वास नांगरे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. सह्याद्री अथितीगृहावर विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. 

शरद पवारांचं सूचक विधानधनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर शरद पवार यांनी आज दुपारी अतिशय सूचक विधान केलं होतं. "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे अतिशय गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले आहेत. 

धनंजय मुंडे प्रकरण विश्वास नांगरे पाटलांकडे?धनंजय मुंडे यांना असलेलं तगडं राजकीय वलय आणि राज्याचं मंत्रीपद ते भूषवत असल्यानं त्यांच्यावरील आरोपांमुळे थेट पक्षाच्या व सरकारच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले असले तरी मुंडे यांनीही याआधी संबंधित महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं असल्यानं त्याची चौकशी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे देण्याबाबत चर्चा झाल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbai policeमुंबई पोलीसRapeबलात्कारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार