शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राष्ट्रवादीनंतर लवकरच काँग्रेसमध्येही भाजप नेत्यांचे इनकमिंग; बाळासाहेब थोरातांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 18:42 IST

congress state precident Balasaheb Thorat: नगर जिल्ह्यातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेस पक्षाचा विचार हा शास्वत विचार असून तोच देश हिताचा आहे, असे थोरात म्हणाले.

मुंबई : काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा विचार हा शास्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.  

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य रमेश जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मदन पथवे, सावरगावपाठचे सरपंच रमेश पवार, समशेरफट गावचे सरपंच भास्करराव दराडे, देवगण गावचे एकनाथ सहाणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, काँग्रेस  सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सचिव रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, राजाराम देशमुख, महिला काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रातील सरकारने गरीब माणसाला ताकद देणारे कामगार हिताचे कायदे बदलण्याचे काम केले आहे. काही मूठभर लोकांसाठी, साठेबाज लोकांसाठी कृषी कायदे केले आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत एक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातला आहे पण केंद्र सरकारकडे सहानुभूती नाही, त्यांची भूमिका क्रूर व अडेलतट्टूपणाची आहे. शेतकरी मूलभूत प्रश्न विचारत आहेत परंतु केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही.

भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती पाहून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, भाजपातून कोणीही जाणार नाही असा खोटा दावा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागत आहे, असेही थोरात म्हणाले..

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपाcongressकाँग्रेस