शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

"दिवाळीत मलाही प्राप्तिकराची नोटीस"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 4:59 AM

पृथ्वीराज चव्हाण; सत्तेचा गैरवापर, भाजपने मर्यादा सोडल्या. कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड  : ‘सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपला पूर्णपणे जमले आहे. त्यांनी गैरवापराच्या मर्यादा सोडल्या आहेत. मलाही दिवाळीच्या मुहुर्तावर इन्कमटॅक्सची नोटीस धाडली आहे. निवडणूक लढविताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील काही मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न विचारले आहेत,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘बिहारची निवडणूक खरंतर जिंकता आली असती. मात्र, काँग्रेस पक्षाची तेथे अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. यावर मी भाष्य करणे उचित नाही. मात्र, यावर चर्चा लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे. ‘राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका ही वादग्रस्त आहे. त्यांनी राज्यपाल म्हणून चौकटीत राहून काम करणे अपेक्षित आहे. मात्र, ते राजकारणच जास्त करताना दिसतात, असेही चव्हाण म्हणाले. 

पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, हाच उद्देशबिहार निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याबाबत छेडले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘तसं काही नाही. बऱ्याच काँग्रेस नेत्यांची एकच इच्छा आहे की, पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला पाहिजे. राहुल गांधींनी ती जबाबदारी स्वीकारावी, अशीही आमची इच्छा आहे. आता राहुल गांधी त्याला राजी झाले नाहीत, तर प्रश्न आहे.’

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणIncome Taxइन्कम टॅक्स