शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

महाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जाण्यास तयार; आमदार प्रताप सरनाईक 'त्या' विधानावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 12:07 IST

कंगना राणौतबद्दलच्या आक्रमक विधानावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ठाम

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेली अभिनेत्री कंगना राणौत सध्या शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असल्याची भावना कंगनानं व्यक्त केल्यानंतर शिवसेनेलादेखील चांगलीच आक्रमक झाली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थेट इशारा दिला आहे. सरनाईक यांनी थोबाड फोडण्याची भाषा केल्यानं या वादात राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री झाली. यानंतर सरनाईक यांनी दोन ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.भाजपनं राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे, अशी रोखठोक भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचं दिसत आहे.

काय म्हणाले होते प्रताप सरनाईक?शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणौत यांच्यात जुंपली असताना प्रताप सरनाईक यांनी थेट थोबाड फोडण्याची भाषा केली. 'कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं सरनाईक म्हणाले होते.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला उपरतीचहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कंगनानं मुंबईबाबतच्या आपल्या भावना ट्विट करून व्यक्त केल्या. त्यात ती म्हणते की, महाराष्ट्रामधील माझ्या मित्रांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहीत आहे. तसंच माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवर असलेल्या माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याचीही मला गरज वाटत नाही. मुंबईनं मला नेहमीच यशोदेप्रमाणे सांभाळलं आहे. कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेने केली पोलिसात तक्रारVIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारणकंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv Senaशिवसेनाpratap sarnaikप्रताप सरनाईकSanjay Rautसंजय राऊतSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत