मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे : नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 15:38 IST2021-02-10T15:37:26+5:302021-02-10T15:38:18+5:30
Nana Patole News : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना "मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही

मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे : नाना पटोले
नागपूर - काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना "मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं "असे म्हटले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज पहिल्यांदा नागपूरला आले त्यामुळे त्यांनी दीक्षाभूमी येथे त्यांनी दर्शन घेतले, त्यावेळी ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. त्या आधी विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी, टेकडी गणपती, ताजबाग येथे दर्शन घेऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला.