...तर शिवसैनिकच नारायण राणेंचा एनकाऊंटर करतील; शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 21:42 IST2021-08-25T21:31:03+5:302021-08-25T21:42:37+5:30
"मातोश्री हे आमचे श्रद्धास्थान आहे. तेथील कोणाचाही अपमान आम्ही सहन करणार नाही. अपमान करणारा कोणीही असो त्याला सोडणार नाही."

...तर शिवसैनिकच नारायण राणेंचा एनकाऊंटर करतील; शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ
यवतमाळ - भाजप नेते नारायण राणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पातळी सोडून बेताल वक्तव्य करीत आहेत. हा प्रकार शिवसैनिक सहन करणार नाहीत. राणे यांचा एनकाऊंटर होण्यापासून शिवसेनेने त्यांना वाचविले होते. आता मात्र शिवसैनिकच राणेंचा एनकाऊंटर केल्याशिवाय राहणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केले आहे. (If do not stop Uddhav thackeray insult the Shiv Sainiks will encounter Narayan Rane; says santosh dhavale)
शहरातील दत्त चौकात शिवसेनेच्यावतीने नारायण राणे यांच्या विरोधात मंगळवारी झालेल्या आंदोलनातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सहभागी झालेले होते. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ढवळे यांनी कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. ठाकरे यांच्यामुळे अनेकांचे जीव वाचल्याचे सांगतानाच ते राणे यांच्यावर घसरले.
'पवारसाहेब, ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा संसस्कृतपणा बघा, राणेंनी वाचनचं केलं'
या व्हायरल व्हिडीओसंदर्भात ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता, मातोश्री हे आमचे श्रद्धास्थान आहे. तेथील कोणाचाही अपमान आम्ही सहन करणार नाही. अपमान करणारा कोणीही असो त्याला सोडणार नाही, असे सांगत ढवळे यांनी व्हिडीओतील वक्तव्याचे समर्थन केले.