शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:21 IST

Ajit Pawar vs supriya sule : डीपीडीसी बैठकीत आमच्यावर दडपशाही करण्यात आल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर अजित पवारांनी सविस्तर खुलासा केला आहे. 

Ajit Pawar on Sharad Pawar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवारांनी प्रश्न विचारला. त्यावरून आम्हाला लेक्चर देण्यात आले आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात आले, असा दावा सुप्रिया सुळेंनी केल्यानंतर अजित पवार भडकले. शरद पवारांचा कधीही अपमान केला नाही. त्यांना दैवत मानत आलोय असे उत्तर अजित पवारांनी दिले.  (Ajit Pawar clarified that I did not insult Sharad Pawar)

अजित पवार काय म्हणाले?

"सुप्रिया सुळेंनी सांगितले की, मी साहेबांचा (शरद पवार) अपमान केला. मी कधीही साहेबांचा अपमान केलेला नाही आणि करणार पण नाही. काही कारण पण नाही. कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे", असा खुलासा अजित पवारांनी केला. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, "पण काहीतरी अशा पद्धतीचे नरेटिव्ह तयार करून त्यातून काही नेत्यांना आणि जनतेला सांगायचं की, साहेबांचा अपमान केला. साहेबांना असं केलं, तसं केलं. कशाचा मी अपमान करतो", असे उत्तर अजित पवारांनी सभेत बोलताना दिले.   

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं होतं?

अजित पवारांनी बैठकीत प्रश्न विचारण्याचा अधिकारच नसल्याचे म्हटल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना केला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "डीपीडीसीच्या बैठकीत शरद पवारांनी एक प्रश्न विचारला की, विकास निधीची विभागणी कशी होते? त्यावर आम्हाला एवढे मोठे लेक्चर देण्यात आले की, तुम्हाला अधिकारच नाही. हे नाही, ते नाही."

"आम्हाला शासन निर्णय दाखवण्यात आला. मी विचारले की, आम्हाला बोलायचाच अधिकार नाही. आम्हाला काहीच अधिकार नाही. मग आम्हाला बैठकीला कशाला बोलवता? पण, नंतर प्रशासनानेच मला सांगितले की, तुम्हाला निमंत्रण देऊन बोलवतात आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. ही दडपशाही आहे", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४