शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

"शिवसेना, अकाली दल नसलेल्या आघाडीला मी एनडीए मानत नाही," संजय राऊतांचा भाजपाला टोला

By बाळकृष्ण परब | Updated: September 27, 2020 14:12 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाने भाजपाशी उभा दावा मांडत एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, अकाली दलाने एनडीए सोडल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहेत.

ठळक मुद्दे शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे दोन मजबूत स्तंभ होतेनडीएत भाजपाला आता नवे मित्र मिळाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतोज्या आघाडीमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाहीत, अशा आघाडीला मी एनडीए मानत नाही

मुंबई - महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडत महाविकास आघाडीत प्रवेश केले होता. तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाने भाजपाशी उभा दावा मांडत एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, अकाली दलाने एनडीए सोडल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहेत.आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे दोन मजबूत स्तंभ होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेला नाईलाजास्तव एनडीएमधून बाहेर पडावे लागले. आता अकाली दलानेही एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. तर एनडीएत भाजपाला आता नवे मित्र मिळाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र ज्या आघाडीमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाहीत, अशा आघाडीला मी एनडीए मानत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.दरम्यान, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबतसुद्धा भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना न भेटालयला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाही. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण