शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जागा वाटपावर अडले युतीचे घोडे, सेनेला हवे पालघर; भाजपाने मारली मेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:40 IST

भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून दोन्ही पक्षांनी एकमेकांना अल्टिमेटम दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.

मुंबई : भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून दोन्ही पक्षांनी एकमेकांना अल्टिमेटम दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. विधानसभेच्या प्रत्येकी १४४ जागा दोन्ही पक्षांनी लढवाव्यात, असा भाजपाचा प्रस्ताव आहे, तर शिवसेनेला पालघर लोकसभेची जागा हवी असून त्या बदल्यात सातारा भाजपाने घ्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.सोमवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव यांनी निर्वाणीची भाषा करत भाजपाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला. तर जालना येथे झालेल्या भाजपा कार्य समितीच्या बैठकीत भाजपानेही स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली. युतीसाठी आम्ही लाचार होणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला इशारा दिला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी १४४ जागा भाजपा-शिवसेनेने लढाव्यात, असा भाजपाचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रस्तावात भाजपाने एक मेख घातल्याने तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधून युतीच्या मित्रपक्षांना (रिपाइं, रासपा आदी) जागा द्याव्यात, अशी ती अट टाकली असल्याचे समजते. तर शिवसेनेला लोकसभेच्या काही जागांची अदलाबदल करून हवी आहे. पालघर आणि भिवंडीसाठी शिवसेना आग्रही आहे; पण त्यावर तुटेपर्यंत ताणायचे नाही, असे धोरण आहे. लोकसभा, विधानसभेच्या जागावाटप एकाचवेळी जाहीर करावे, असा सेनेचा आग्रह आहे.मोठा भाऊ आम्हीच- खा. राऊतभाजपा-शिवसेनेत युतीसाठी चर्चा सुरू असताना शिवसेनेने मात्र त्याचा इन्कार केला. खासदारांच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते खा.संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे व राहणार. दिल्लीचे तख्त हा मोठा भाऊ गदागदा हलविणार. भाजपाकडून युतीचा कोणताही प्रस्ताव नाही. सगळ्या अफवा आहेत. देशभरात ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्वांचाच आयकर माफ करावा, असा ठराव बैठकीत मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.फाजील आत्मविश्वास बाळगू नका - अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांनी फाजील आत्मविश्वास बाळगू नये. जनमताचा कौल कोणाकडे आहे आणि आमच्या जनसंघर्ष यात्रेचा नेमका किती परिणाम झाला, हे मतदानानंतर समजेलच. जनतेत असलेली नाराजी मुख्यमंत्र्यांना लवकरच कळेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा