How can action be taken where there are opposition governments? Doubts presented by Sachin Sawant | विरोधी पक्षाची सरकारे असतात तिथेच कारवाई कशी होते? काँग्रेसने उपस्थित केली शंका

विरोधी पक्षाची सरकारे असतात तिथेच कारवाई कशी होते? काँग्रेसने उपस्थित केली शंका

ठळक मुद्देशरद पवार, सुप्रिया ताई व पृथ्वीराज चव्हाण यांना आयटीची नोटीस दिली गेली आहे ज्यांना विरोधी पक्षात असताना चोर म्हणतात ते भाजपात गेल्यावर पवित्र कसे होतात?प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई ही मविआ सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राचा भाग आहे

मुंबई - शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राच्या राजाकारणात मोठा भूकंप झाला आहे. दरम्यान, ईडीने केलेल्या या कारवाईवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजपा नेत्यावर इडी, सीबीआय़ किंवा आयटी ची कारवाई झाली आहे का? विरोधी पक्षाची सरकार असतात तिथेच कारवाई का होते? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजपा नेत्यावर ईडी, सीबीआय किंवा आयटीची कारवाई झाली का? विरोधी पक्षाची सरकार असतात तिथेच कारवाई का होते? कमलनाथांच्या लोकांवर, गेहलोत सरकार पाडण्यासाठी व कर्नाटक मध्ये तेच झाले! शरद पवार, सुप्रिया ताई व पृथ्वीराज चव्हाण यांना आयटीची नोटीस दिली गेली आहे.भाजपाचा एकही उमेदवार यांना सापडू नये? ज्यांना विरोधी पक्षात असताना चोर म्हणतात ते भाजपात गेल्यावर पवित्र कसे होतात? भाजपाने लोकशाही संकटात आणली आहे हे जनतेने ओळखावं. प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई ही मविआ सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राचा भाग आहे. पण आम्ही एक आहोत, असेही सावंत यांनी सांगितले आहे.दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं होतं.. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

Web Title: How can action be taken where there are opposition governments? Doubts presented by Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.