शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

हेलिकॉप्टर, छोट्या विमानांचे प्रचारासाठी बुकिंग फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 6:35 AM

लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांना जास्त मागणी असल्याने विविध मतदारसंघांत जाण्यासाठी हवाई प्रवासालाच ते प्राधान्य देत आहेत.

- खलील गिरकर मुंबई : लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांना जास्त मागणी असल्याने विविध मतदारसंघांत जाण्यासाठी हवाई प्रवासालाच ते प्राधान्य देत आहेत. मात्र, राजकीय नेत्यांकडून मागणी जास्त व हेलिकॉप्टर, लहान विमानांची संख्या कमी असल्याने प्रचारासाठी अनेकांवर रस्ते मार्गाने प्रवास करण्याची वेळ आली आहे.देशभरात सुमारे २०० खासगी हेलिकॉप्टर वापरात आहेत. त्यापैकी प्रचारासाठी सुमारे १२५ हेलिकॉप्टर सेवेत आहेत. त्यांचे आरक्षणपूर्वीच झाल्याने आता हेलिकॉप्टर व विमाने मिळवणे अवघड जात आहे. राज्यात सुमारे १८ हेलिकॉप्टरआहेत; त्यांचे आरक्षणही फुल्ल झालेले आहे.एमएबी एव्हिएशनचे मंदार भारदे म्हणाले, एन्ट्री लेव्हल हेलिकॉप्टरचा दर प्रति तास १ लाख रुपये आहे, तर अत्याधुनिक सुविधा असलेल्या हेलिकॉप्टरचा दर तासाला साडेचार लाख रुपयांपर्यंत आहे. हेलिकॉप्टरचा वेग, जास्त केबिन कम्फर्ट अशा विविध सुविधांमुळे हेलिकॉप्टरच्या भाड्यामध्ये वाढ होते. हेलिकॉप्टर व विमाने आरक्षित करण्यामध्ये भाजपचा प्रथम क्रमांक आहे. त्याखालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी आरक्षण केले आहे.जवळच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमान असा प्राधान्यक्रम असल्याची माहिती एलॉफ्ट एव्हिएशनच्या संचालिका निशा शर्मा यांनी दिली. २६ एप्रिलपर्यंत हेलिकॉप्टरचे आरक्षण फुल्ल झाले असून त्यानंतर राज्याबाहेरील प्रचारासाठी छोटी विमाने आरक्षित करण्यात आलेली आहेत. आमच्या ताफ्यातील ३ हेलिकॉप्टर व ३ विमाने आरक्षित आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट ग्राहकांचे आरक्षण सध्या घेतले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.>ग्रामीण भागात जाण्यासाठी हेलिकॉप्टरला पसंतीहेलिकॉप्टरसोबत प्रचारामध्ये छोट्या विमानांचाही समावेश आहे. छोट्या विमानांचे उड्डाणाचे दर प्रति तास साधारण एक लाख ते साडेचार लाख इतके आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारची८ ते १० छोटी विमाने वापरात आहेत.विमानांचे उड्डाण व लँडिंगसाठीधावपट्टी व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करता तुलनेने तात्पुरते हेलिपॅड उभारणे सहज शक्य असल्याने ग्रामीण भागात जाण्यासाठी नेत्यांचा ओढा हेलिकॉप्टरकडेच असल्याचे भारदे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019MumbaiमुंबईBJPभाजपाcongressकाँग्रेस