शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
2
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
3
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
6
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
7
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
8
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
9
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
10
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
11
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
12
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
14
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
15
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
16
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
17
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
18
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
19
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
20
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका

50 कोटी द्या, मोदींना ठार करतो; तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 08:33 IST

व्हिडीओवरुन भाजपाची तेजबहादूर यादव, समाजवादी पार्टीवर सडकून टीका

नवी दिल्ली: बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. मला 50 कोटी द्या. मोदींना ठार करतो, असं तेजबहादूर यादव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ म्हणजे माझ्या विरोधात रचण्यात आलेला कट असल्याचं तेजबहादूर यादव यांनी म्हटलं आहे. 'लोकमत'नं या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत आपणच असल्याचं यादव यांनी मान्य केलं आहे. मात्र हे आपल्या विरोधात रचण्यात आलेलं कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला. यावरुन भाजपानं तेजबहादूर यांच्यावर सडकून टीका केली. 'समाजवादी पार्टीनं उमेदवारी दिलेल्या तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ पाहून आम्हाला धक्का बसला. सपानं त्यांना वाराणसीतून उमेदवारी दिली. मात्र काही कारणांमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. आता ते 50 कोटींसाठी मोदींच्या हत्येचा कट रचताना टीव्हीवर दिसत आहेत,' अशा शब्दांत भाजपाचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओवरुन भाजपानं काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं. 'काँग्रेससारखा पक्ष सरकारच्या मागे उभा राहण्याऐवजी अशा समाजविरोधी घटकांच्या पाठिशी उभा राहतो. पंतप्रधानांच्या हत्येची भाषा करणाऱ्या व्यक्तीला समाजवादी पार्टीकडून उमेदवारी दिली जाते. हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सर्व यंत्रणांनी मोदींना असलेल्या धोक्याची दखल घ्यावी,' असं नरसिंह राव पुढे म्हणाले. मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं 1 मे रोजी बाद ठरवला. बीएसएफनं केलेल्या कारवाईची माहिती न दिल्यानं यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. भ्रष्टाचार किंवा निष्ठेवर शंका उपस्थित करुन बीएसएफमधून निलंबन न झाल्याची कागदपत्रं जमा न केल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी