गहलोत सरकार संकटात?, सचिन पायलट समर्थक आमदारांचा अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:10 IST2021-06-10T09:10:09+5:302021-06-10T09:10:38+5:30
Sachin Pilot : सचिन पायलट समर्थकांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे.

गहलोत सरकार संकटात?, सचिन पायलट समर्थक आमदारांचा अल्टिमेटम
जयपूर : राजस्थानचे अशोक गहलोत सरकार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्षश्रेष्ठींना अल्टिमेटम दिला आहे. जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नियुक्त्या करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र आहोत अशी भूमिका राजस्थानात पायलट समर्थकांनी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरी सुरू आहेत.
सचिन पायलट समर्थकांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे.