शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

चार आमदारांचे राजीनामे, या राज्यात काँग्रेसचं सरकार अल्पमतात

By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 2:55 PM

Congress government is in the Minority : आधीच देशातील काही मोजक्याच राज्यांत काँग्रेसची सत्ता राहिली असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार अल्पमतात आलं आहे.

ठळक मुद्देएकाच वेळी पाच आमदार गमावल्याने पुदुचेरीमध्ये काँग्रेसला मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागले गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या आमदारांनी एकापाठोपाठ एक असे राजीनामे दिलेतर एक आमदार अयोग्य घोषित

नवी दिल्ली - आधीच देशातील काही मोजक्याच राज्यांत काँग्रेसची सत्ता राहिली असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वातील सरकार अल्पमतात आलं आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये (Puducherry) चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. पुदुचेरीमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीबाबतच्या रणनीतीची चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पुदुचेरीमध्ये येणार होते. मात्र त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडल्याचे समोर आले आहे. ( Congress government is in the minority in Puducherry)एकाच वेळी पाच आमदार गमावल्याने पुदुचेरीमध्ये काँग्रेसला मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच त्यांना बहुमत गमवावे लागले आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या आमदारांनी एकापाठोपाठ एक असे राजीनामे दिले आहेत. काहींनी ट्विट करून राजीनाम्याची घोषणा केली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने ४ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.

दुसरीकडे एनआर काँग्रेसने ७ आणि मित्रपक्ष असलेल्य एआयएडीएमकेने ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र नायब राज्यपाल किरण बेदी यांनी भाजपाच्या तीन जणांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे ३० सदस्यीय विधानसभेची सदस्यसंख्या वाढून ३३ झाली होती.दरम्यान, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यावर काम करू देत नसल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे किरण बेदींविरोधात पत्र दिले होते. नायब राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आम्ही मोकळ्या वातावरणात काम करू शकत नाही आहोत, असा आरोप नारायणसामी यांनी केला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणIndiaभारत