Former Naxalite leader who abandoned the path of violence and contested the elections, slammed the Naxalites, said ... | हिंसेचा मार्ग सोडून निवडणूक लढवणाऱ्या माजी नक्षली नेत्याने केली नक्षलवाद्यांची पोलखोल, म्हणाले... 

हिंसेचा मार्ग सोडून निवडणूक लढवणाऱ्या माजी नक्षली नेत्याने केली नक्षलवाद्यांची पोलखोल, म्हणाले... 

कोलकाता - देशातील काही राज्यांत सक्रिय असलेला नक्षलवाद (Naxalites ) हा देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मात्र देशातील लोकशाही व्यवस्थेला नेहमी विरोध करत असलेले नक्षलवादी मोठ्या संख्येने मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत.  (West Bengal Assembly Elections 2021)अशा परिस्थिती पूर्वाश्रमीचे नक्षलवादी नेते बिनॉय कुमार यांनी नक्षलवाद आणि नक्षलवादी यांची पोलखोल करणारे विधान केले आहे. बिनॉय कुमार (binoy kumar) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत उत्तर दिनाजापूरमधील रायगंज येथील करनदीघी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. (Former Naxalite leader who abandoned the path of violence and contested the elections, slammed the Naxalites )

बिनॉय कुमार म्हणाले की, निवडणुकीचा बहिष्कार करणारे नक्षलवादी हे खोटारडे आणि भांडवलदारांचे नोकर आहेत. हे सर्वजन कमिशन घेऊन स्वत:चे खिसे भरत आहेत, नवभारत टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत बिनॉय यांनी हे विधान केले आहे. 

 नक्षलवादी हल्ल्याबाबत बिनॉय म्हणाले की, जे नक्षलवादी आज लोकांना मारत आहेत, ते हा विकार करत नाही की, हे सैनिकसुद्धा आमच्या कुटुंबातून आम्ही तयार केले आहेत. तेसुद्धा भारतीय नागरिक आहेत आणि भारताच्या झेंड्याखाली काम करतात. तरीही नक्षलवादी आपल्याच देशाच्या नागरिकांना का मारत आहेत. हा सर्व भांडवलदारांचा खेळ आहे. 

 अर्बन नक्षलवादाबाबत बिनॉय म्हणाले की, हे लोक नक्षलवादी क्रांती समजून घेत नाहीत. खरंतर हे नक्षलवादीच नाही आहेत. या लोकांना स्थानिक प्रशासन राज्य सरकार आणि राजकीय पक्षांकडून कंट्रोल केले जाते. आता जनतेने मला संधी दिली तर मी सर्वात आधी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे काम करेन. एवढी वर्षे झाल्यानंतरही लोकांच्या या मुलभूत गरजांची पूर्तता झालेली नाही. 
 
मूळचे कर्णजोरा, कालीबारी येथील रहिवासी असलेले बिनॉय यांच्या वडिलोपार्जित संपत्तीची किंमत ६५० कोटी ८२ लाख ५७ हजार रुपये आहे. माहितीनुसार त्यांच्याजवळ १०० एकरांहून अधिक जमीन, रायगंज, माल्दा, जलपैगुडी, हरियाणा, वाराणसीसह अनेक ठिकाणी १४ निवासस्थाने आहेत. असे असले तरी बिनॉय हे भाड्याच्या घरात वास्तव्य करतात. बिनॉय यांनी २०१८ मघ्या रायगंज जिल्हा परिषद आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

Web Title: Former Naxalite leader who abandoned the path of violence and contested the elections, slammed the Naxalites, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.