एकनाथ खडसे कधी बांधणार 'घड्याळ'?; खंद्या सर्मथकांनी सांगितलं 'टायमिंग'

By मुकेश चव्हाण | Published: October 14, 2020 04:03 PM2020-10-14T16:03:54+5:302020-10-14T16:29:04+5:30

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला, असं एकनाथ खडसेंनी सांगितल्याचं उदेसिंग पाडवी यांनी सांगितले.

Former MLA Udesingh Padvi said that BJP leader Eknath Khadse will join NCP on the first day of his navratri | एकनाथ खडसे कधी बांधणार 'घड्याळ'?; खंद्या सर्मथकांनी सांगितलं 'टायमिंग'

एकनाथ खडसे कधी बांधणार 'घड्याळ'?; खंद्या सर्मथकांनी सांगितलं 'टायमिंग'

Next

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री  एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचे वृत्त सोशल मीडियात झळकत होते. त्यातच आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी देखील एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा एकनाथ खडसेंचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार, उदेसिंग पाडवी म्हणाले की, एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली असून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला, असं एकनाथ खडसेंनी सांगितल्याचं उदेसिंग पाडवी यांनी सांगितले. तसेच एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत योग्य मानसन्मान मिळणार असून त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार असल्याचा दावा उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

खडसे पक्षांतर करणार नाही- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जामनेर येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, या कार्यक्रमाला खडसे यांनी अपेक्षेप्रमाणे गैरहजर राहिले तर खासदार सुनबाई व समर्थकांनी मात्र उपस्थिती दिली. खडसे यांच्याशी दिवसभरात कोणतीही चर्चा झाली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यापैकीच, एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली. त्यावर, अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी म्हटले होते. खडसे आणि कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.  
  
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून चाचपणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली. मात्र, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Web Title: Former MLA Udesingh Padvi said that BJP leader Eknath Khadse will join NCP on the first day of his navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.