शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कृपाशंकर सिंह भाजपत; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा पक्षातला नाही, तर दुसऱ्या विचारधारतेला प्रवेश.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 15:02 IST

Former minister Kripashankar Singh joins BJP : दोन वर्षांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी सोडला होता काँग्रेसचा हात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिंह यांचा भाजपत प्रवेश. 

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी सोडला होता काँग्रेसचा हात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिंह यांचा भाजपत प्रवेश. 

महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा विरोध केला होता आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांचं स्वागत करत त्यांचा प्रवेश हा पक्षातील नसून एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झालेला प्रवेश असल्याचं म्हटलं. 

"कृपाशंकर सिंह हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं होतं. परंतु ज्यावेळी काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान अंतिम उपाय चाचपडत असल्याचं त्यांना समजलं आणि काँग्रेसचा विरोध असल्याचं कळलं, तेव्हा मोदींना त्यांनी पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागा झाला होता. जर काँग्रेसनं समर्थन केलं नाही, तर आपण पक्षातून बाहेर पडू असा इशारा त्यांनी दिला होता," असं फडणवीस यावेळी म्हणाले.  "जेव्हा ते पक्षातून बाहेर पडले तेव्हा ते लगेच भाजपत सामील झाले नाहीत. त्यांनी २०-२१ महिने काश्मीर प्रश्नावर काम केलं आणि दोन वर्षांनी ते भाजपत सामील झाले. त्यांच्या हा प्रवेश एका पक्षातून दुसऱ्या पक्षातला नसून त्यांनी एक विचारधारा सोडत दुसऱ्या विचारधारेचा स्वीकार केला आहे," असंही त्यांनी नमूद केलं. 

काँग्रेसचा आरोपकृपाशंकर सिंग यांच्या भाजपत सामील होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसनं त्यांच्यावर आरोप करत निवडणुका जिंकण्याच्या गरजेसाठी ते भाजप किंवा शिवसेनेत जाऊ इच्छित असल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या संपर्कात होते. तसंच ते फडणवीस यांच्याही संपर्कात होते, असं म्हटलं जात आहे.

टॅग्स :Kripashankar Singhकृपाशंकर सिंगDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाj. p. naddaजे. पी. नड्डा