शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

Remadesivir: माजी भाजप आमदाराने रांगा लावून विकले रेमडेसिविर; नवाब मलिकांनी दिला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 06:16 IST

Remadesivir sold by former bjp Mla shirish chaudhari : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा गंभीर आरोप. एखादा माजी आमदार बेकायदेशीरपणे २० हजार इंजेक्शन्सचा साठा ठेवतो, विकतो, आणि नंतर तोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटतो. हे सगळे मोठे षड‌्यंत्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून नंदुरबारच्या हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा जमा करून ठेवला. ८ आणि १२ एप्रिल रोजी त्यांनी नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात रांगा लावून इंजेक्शन्सचा काळाबाजार केला. त्यांनी २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिविर ब्रुक फार्मा कंपनीकडून आणून ठेवले होते. त्यामुळेच राज्याच्या एफडीएने वारंवार विचारणा करूनही ब्रुक फार्मा महाराष्ट्रात इंजेक्शन्स देण्यास तयार नाही, असा गंभीर गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी इंजेक्शन्सची विक्री चालू असलेले व्हिडिओ, फोटो, त्यांनी केलेल्या जाहिरातीदेखील माध्यमांना दिल्या आहेत.

एखादा माजी आमदार बेकायदेशीरपणे २० हजार इंजेक्शन्सचा साठा ठेवतो, विकतो, आणि नंतर तोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटतो. हे सगळे मोठे षड‌्यंत्र आहे. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात त्यांचा गोरखधंदा सुरू होता. त्याचवेळी विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे लेखी तक्रार करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करणार असल्याचेही ते म्हणाले. 

आणखी गौप्यस्फोट करण्याचा इशाराnतुमचा कारभार किती ‘क्रिस्टल’ आहे, याचा भंडाफोड आम्ही करू. भतीजाकडून कोणी काय मिळवले हेदेखील दाखवून देऊ. nकांदिवली - मालाडचे आमदार रात्री कुठे बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ईडीमार्फत तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून काय काय घेतले आहे. किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येत्या काळात आम्ही जाहीर करू, असा इशाराही मलिक यांनी दिला.

‘गरीब रुग्णांना वाटप केले हा गुन्हा ठरतो का?’नंदुरबार : कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खान्देशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून कमी दरात रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरवले. हा गुन्हा वाटत असेल तर आम्ही गुन्हा केला, फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच आणि पुन्हा तो करणार, असे हिरा प्रतिष्ठानचे संचालक तथा माजी आमदार शिरिष चौधरी यांनी सांगितले.

असे आहेत आरोपब्रुक फार्मा कंपनीकडून घेतले इंजेक्शन्स२० हजारपेक्षा जास्त इंजेक्शन्सचा साठा८ आणि १२ एप्रिल रोजी रांगा लावून विक्रीनंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात काळाबाजारयांची घेतली नावेभाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ.हे दिले पुरावेइंजेक्शन्सची विक्री चालू असलेले व्हिडिओ, फोटो, त्यांनी केलेल्या जाहिराती.हे प्रश्न केले उपस्थित...शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का? महाराष्ट्र एफडीएने त्यांना तसा परवाना दिला होता का? दमणच्या एफडीएने महाराष्ट्रात त्यांना इंजेक्शन विकण्याचा परवाना दिला होता का?

टॅग्स :BJPभाजपाnawab malikनवाब मलिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस