शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, "काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 5:04 PM

Farooq Abdullah on Congress : देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्य

ठळक मुद्देदेश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्यभाजपवरही अब्दुल्ला यांनी साधला निशाणा

एकेकाळी अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात सत्तेत असलेली काँग्रेस सध्या तितक्या चांगल्या स्थितीत नाही. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर काही राज्यांमधील निवडणुकांमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आता कमकुवत झाली असून घरात बसून काम चालणार नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. "काँग्रेस आता कमकुवत झाली आहे. मी हे अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. जर त्यांना देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे. तसंच त्यांना मजबूतीनं पुन्हा उभं राहावं लागेल. त्यांना लोकांच्या समस्यांबद्दलही जाणून घ्यावं लागेल आणि हे सर्व घरी बसून होणार नाही," असं अब्दुल्ला म्हणाले.  यावेळी त्यांनी काँग्रेससोबत भाजपवरही निशाणा साधला. "त्यांनी नुकतंच सांगितलं होतं की ते पुढील सरकार स्थापन करतील. हे कसं होईल हे मी पाहणार आहे. ते काय आकाशातून येतील? आम्ही त्यांच्या मार्गांमध्ये उभे राहू आणि तुम्ही आम्हाला कसं हटवाल. नॅशनल कॉन्फरन्सचा इतिहास हा बलिदान देण्याचा आहे. पक्षा जनतेच्या हृदयात आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता ते निवडणुकांसाठी लोकांच्यामध्ये असंतोष पसवत आहेत, असा आरोपही केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाBJPभाजपाElectionनिवडणूक