एकेकाळी अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात सत्तेत असलेली काँग्रेस सध्या तितक्या चांगल्या स्थितीत नाही. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर काही राज्यांमधील निवडणुकांमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आता कमकुवत झाली असून घरात बसून काम चालणार नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. "काँग्रेस आता कमकुवत झाली आहे. मी हे अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. जर त्यांना देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे. तसंच त्यांना मजबूतीनं पुन्हा उभं राहावं लागेल. त्यांना लोकांच्या समस्यांबद्दलही जाणून घ्यावं लागेल आणि हे सर्व घरी बसून होणार नाही," असं अब्दुल्ला म्हणाले.
काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, "काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 17:06 IST
Farooq Abdullah on Congress : देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्य
काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही
ठळक मुद्देदेश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्यभाजपवरही अब्दुल्ला यांनी साधला निशाणा