शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

गुलाम नबी आझाद यांना बंगल्यात राहाण्यास मुदतवाढ; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 6:06 AM

गुलाम नबी आझाद फेब्रुवारी महिन्यापर्यंत राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते; पण त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली. त्यानंतर महिनाभरात त्यांनी शासकीय बंगला रिकामा करणे आवश्यक होते; मात्र तसे काही न होता केंद्र सरकारने त्यांना निवासासाठी मुदतवाढ दिली.

- हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसमधील नाराज नेत्यांपैकी एक असलेले व सध्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या गुलाम नबी आझाद यांना ल्यूटन्स भागातील शासकीय बंगल्यात यापुढेही राहाण्याची परवानगी मोदी सरकारने दिली आहे. तसा औपचारिक निर्णय लवकरच होईल. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसहित त्या पक्षातल्या अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

गुलाम नबी आझाद फेब्रुवारी महिन्यापर्यंत राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते; पण त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली. त्यानंतर महिनाभरात त्यांनी शासकीय बंगला रिकामा करणे आवश्यक होते; मात्र तसे काही न होता केंद्र सरकारने त्यांना निवासासाठी मुदतवाढ दिली. याविषयी निवासव्यवस्थेच्या संदर्भातील कॅबिनेट समिती लवकरच औपचारिक निर्णय घेईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल त्या पक्षातील गुलाम नबी आझाद यांच्यासह २३ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आझाद यांच्याबाबत अनुकूल निर्णय घेऊन केंद्र सरकार काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करू इच्छिते, अशी चर्चा आहे. काँग्रेसमधील नाराज नेते आणखी दुखावले जाऊ नये, यासाठी त्या पक्षाचे नेतृत्व सध्या प्रयत्नशील आहे. काँग्रेसचा त्याग केलेल्या जितीनप्रसाद यांचे भाजप नेतृत्वाने जंगी स्वागत केले होते. काँग्रेसचे आणखी काही महतत्त्वाचे नेते गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

प्रियांका गांधी यांना वेगळा न्याय का?गुलाम नबी आझाद यांना शासकीय बंगल्यामध्ये राहण्याची परवानगी आणखी काही काळापुरतीच मिळाली आहे; मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना झेड प्लस सुरक्षा असूनही त्यांना शासकीय बंगल्यात राहाण्याची मुदत केंद्राने वाढवून दिली नव्हती. प्रियांका गांधींना केंद्राने वेगळा न्याय का लावला, असा सवाल काँग्रेसमधील काही नेते विचारत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा