शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

“राजेंना राज्यसभेवर घेतलं परंतु प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

By प्रविण मरगळे | Updated: October 8, 2020 17:32 IST

Prakash Ambedkar, Nilesh Rane News: प्रकाश आंबेडकरांना कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही असा टोला माजी खासदार निलेश राणेंनी लगावला आहे.

मुंबई – मराठा आरक्षणावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजेंवर टीका केली, त्याविरोधात आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एक राजा बिनडोक आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर नाव न घेता टीका केली होती, त्याला माजी खासदार निलेश राणेंनीही उत्तर दिलं आहे.

याबाबत निलेश राणेंनी ट्विट केले आहे की, प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा गरळ ओकली, दोन ठिकाणी लोकसभा निवडणुकीत उभे राहूनसुद्धा जेमतेम फक्त डिपॉझिट वाचू शकलं, त्यांची राजघराण्याबद्दल बोलायची इतकी लायकी नाही, राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?   

दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही, एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु ते आरक्षणसोडून इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे.

...तर महाराष्ट्रात यादवी माजली असती.

अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगले आहेत, महाराष्ट्र घडवलेला असे राज्यकर्ते आहेत, नेतृत्वाचा विषय त्यांचा आहे. आरक्षणाचा मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न काही जणांचा आहे, ज्यांना घटना माहिती नाही, त्यांनी बोलू नये, आरक्षण हे घटनेने दिले आहेत, ज्यांना आरक्षण दिलंय त्यांच्याशी उघड भांडण करायचं आहे का? मराठा समाजाचे मोर्चे निघाले तसे ओबीसी समाजाचे निघाले होते, तेव्हा मी शांत राहण्याचं आवाहन केलं अन्यथा महाराष्ट्रात यादवी निर्माण झालं असतं, त्यामुळे शांत असलेल्या वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये, स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातोय अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही

उदयनराजे भोसले यांच्यावर जी टीका केली ती निंदणीय आहे, त्यांची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. छत्रपती घराणं, त्यांच्या गादीला महाराष्ट्रातील जनता वंदन करत असते. दोन्हीही छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशाप्रकारे टीका करणे हे गैर आहे, चुकीचं आहे, आम्ही सातारकर, छत्रपतींचे मावळे म्हणून ही टीका अजिबात सहन करणार नाही असा इशारा शिवसेना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला.

तसेच आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडावी, मराठा समाज ठामपणे भूमिका मांडून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला दोन्ही राजेंनी त्यांची भूमिका सरकारकडे ठेवली आहे. सातारच्या गादीचा अवमान कधीही सहन करणार नाही, २०१४ मध्ये खासदार उदयनराजेंवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही विधिमंडळाचं सभागृह कामकाज बंद पाडलं होतं, त्यामुळे सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी त्यांच्या छत्रपतींच्या वारसावर केलेली टीका सहन करणार नाही असं शंभुराज देसाईंनी सांगितले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षणNilesh Raneनिलेश राणे Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर