शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार

By हेमंत बावकर | Updated: October 30, 2020 20:17 IST

Kamalnath : कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद गमावणाऱ्या काँग्रेसच्या कमलनाथांवर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर पोटनिवडणूक होत असून प्रचारावेळी भाजपाच्या महिला उमेदवाराला आयटम म्हणणे कमलनाथांना आणि काँग्रेसला भारी पडले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. 

कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर काँग्रेसने न्य़ायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. नरेंद्र सलूजा यांनी सांगितले की, पक्ष कमलनाथ यांच्यावर आयोगाने केलेल्या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार आहे. 

कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना आयटम असे संबोधले होते. यावरून वाद होताच त्यांनी मला नाव आठवत नव्हते, म्हणून आयटम म्हटल्याची सारवासारव केली होती. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना नौटंकी कलाकार असेही म्हटले होते. या दोन्ही वक्तव्यांविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर निव़डणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. 

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, कमलनाथ यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यांना वेळोवेळी समजही देण्यात आली होती. तरीही त्यांनी आचारसंहिता भंग करणे सुरुच ठेवल्याने ही कारवाई केली आहे. आचारसंहिता कलम एक आणि दोन नुसार ही कारवाई केली असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

किती फटका बसणारकमलनाथ यांचे स्टार प्रचारक पद गेल्याचा फटका काँग्रेसला बसणार नसला तरीही त्यांच्या उमेदवारांना बसणार आहे. कमलनाथ यापुढेही प्रचारसभा घेऊ शकणार आहेत. मात्र, या सभांचा खर्च पक्षाच्या खात्यात नाही तर उमेदवारांच्या खात्यात मोजला जाणार आहे.  

केरळमधील वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकार परिषदेदरम्यान, कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कमलनाथ माझ्या पक्षाचे आहेत. मात्र त्यांनी वापरलेली भाषा मला व्यक्तिगतरीत्या मान्य नाही. कुणीही असो मी अशा भाषेला अजिबात मान्य करणार नाही. कुणीही असो, अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, सामान्यपणे, मला वाटते की, देशातील महिलांबाबत प्रत्येक पातळीवर आपल्या व्यवहारात सुधारणा होण्याची गरज आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था असो वा आदरभाव असो. सरकार, व्यवसाय आणि कुठल्याही अन्य क्षेत्रात त्यांच्या स्थानाबाबत असो. देशातील महिला देशाचा गौरव आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुतील भाजपा उमेदवार असलेल्या इमरती देवी यांचे नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा