Bihar Election 2020: निवडणूक आयोगानं शिवसेनेला 'धनुष्यबाण' नाकारलं अन् 'बिस्किट' दिलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:50 IST2020-10-11T03:11:24+5:302020-10-11T06:50:51+5:30
Bihar Assembly Election, Shiv Sena Symbol News: बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दलाचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. त्यामुळे ते चिन्ह देता येणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले होते. तेथे शिवसेना ५० जागा लढण्याच्या तयारीत आहे.

Bihar Election 2020: निवडणूक आयोगानं शिवसेनेला 'धनुष्यबाण' नाकारलं अन् 'बिस्किट' दिलं
मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली असून आता आयोगाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर वा बॅट यापैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली होती. बिहार निवडणुकीत ही तिन्ही चिन्हे खुली आहेत. मात्र, आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले. बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दलाचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. त्यामुळे ते चिन्ह देता येणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले होते. तेथे शिवसेना ५० जागा लढण्याच्या तयारीत आहे.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची नावे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- आदित्य ठाकरे
- सुभाष देसाई
- संजय राऊत
- चंद्रकांत खैरे
- अनिल देसाई
- विनायक राऊत
- अरविंद सावंत
- गुलाबराव पाटील
- राजकुमार बाफना
- प्रियंका चतुर्वेदी
- राहुल शेवाळे
- कृपाल तुमाणे
- सुनील चिटणीस
- योगराज शर्मा
- कौशलेंद्र शर्मा
- विनय शुक्ला
- गुलाबचंद दुबे
- अखिलेश तिवारी
- अशोक तिवारी
सध्या नाही एकही जागा
बिहारमध्ये उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा.प्रियांका चतुर्वेदींवर आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१५ च्या निवडणुकीत सेनेने ८० जागा लढविल्या. एकही जागा जिंकली नव्हती. सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून २,११,१३१ मते मिळाली होती. पक्षाचे सात उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा भाजपा प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे बिहारच्या रणांगणात दोन मराठी नेते परस्परविरोधी आक्रमक होणार का? हे आगामी काळात कळेल.