शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

योगी, मायावतींना वादग्रस्त भाषण भोवणार?; निवडणूक आयोगानं 24 तासांत मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 23:18 IST

दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतींना जोरदार धक्का दिला आहे. या दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगानं वादग्रस्त विधानांबद्दल नोटीस बजावली. 24 तासांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दोन्ही नेत्यांना देण्यात आलं आहे. या नेत्यांवर आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई होऊ शकते.हिंदूंकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असं वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ मेरठमधील प्रचारसभेत केलं होतं. सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं होतं. तर मायावतींनी मुस्लिमांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. या वादग्रस्त विधानांची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. काय बोलले होते योगी आदित्यनाथ?हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले होते.काय बोलल्या होत्या मायावती?मुस्लिमांनो, काँग्रेस भाजपाला टक्कर देऊ शकत नाही. फक्त महाआघाडीच भाजपाचा पराभव करु शकते. मतविभाजन टाळून महाआघाडीला एकगठ्ठा मते द्या. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणाची तपासणी सुरूपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलच्या विधानाची निवडणूक आयोगाकडून तपासणी सुरू आहे. मोदींनी बालाकोट एअर स्ट्राइकचा उल्लेख करत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय नमो टीव्हीवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग