अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री ठरले; शरद पवारांनी सगळ्यात विश्वासू शिलेदारालाच निवडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 07:29 PM2021-04-05T19:29:10+5:302021-04-05T19:44:21+5:30

Dilip Walse Patil will take charge of Home minister of Maharashtra: राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर होती. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही यांचेही नाव चर्चेत होते. 

Dilip Walse Patil is the new Home Minister of Maharashtra; Uddhav Thackeray's letter to the Governor | अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री ठरले; शरद पवारांनी सगळ्यात विश्वासू शिलेदारालाच निवडले!

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री ठरले; शरद पवारांनी सगळ्यात विश्वासू शिलेदारालाच निवडले!

googlenewsNext

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे गृहमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. (Dilip Walse Patil's Labour department charge is being given to Hasan Mushrif as additional charge and state Excise Department will be looked after by Deputy CM Ajit Pawar: Maharashtra CMO)




राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर होती. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही (Dilip Walse Patil) यांचेही नाव चर्चेत होते. 


अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. (Dilip Walse Patil's Labour department charge is being given to Hasan Mushrif as additional charge and state Excise Department will be looked after by Deputy CM Ajit Pawar: Maharashtra CMO)

उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने पदाचा राजीनामा देऊन अनिल देशमुख दिल्लीला गेले आहेत. 

काय म्हणाले अनिल देशमुख?
अँड जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने १०० कोटी वसुलीच्या आरोपाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर अनिल देशमुख म्हणाले की,उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मी गृहमंत्रीपदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. त्यामुळे, मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे, असे अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. तसेच, मला गृहमंत्री या पदावरुन कार्यमुक्त करावे, असेही त्यांनी म्हटलंय.

 

Read in English

Web Title: Dilip Walse Patil is the new Home Minister of Maharashtra; Uddhav Thackeray's letter to the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.