Dhananjay Munde's big statement regarding resignation of ministerial post, said ... | "माझा राजीनामा मागितलेला नाही, मी राजीनामा दिलेला नाही", धनंजय मुंडेंच मोठं विधान

"माझा राजीनामा मागितलेला नाही, मी राजीनामा दिलेला नाही", धनंजय मुंडेंच मोठं विधान

ठळक मुद्देपक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाहीतसेच मी राजीनामा दिलेला नाहीराजीनाम्याच्या चर्चेदरम्यान धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

मुंबई - एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. त्यातच धनंजय मुंडेंवरील आरोप हे गंभीर असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे तसेच त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत मोठे विधान केले आहे.

पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. मात्र बलात्काराचे आरोप आणि अपत्यांबाबतची माहिती लपवल्याने विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडेंना सातत्याने लक्ष्य करण्यात येत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. आता पोलीस चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल. असी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

धनंजय मुंडेवरील आरोपांबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. शदर पवार म्हणाले की, "धनंजय मुंडेंनी काल माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच न्यायालयात गेले. त्यामुळे न्यायालयाच्या विषयावर मी बोलणार नाही,' असं शरद पवार यांनी सांगितलं.
"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल," असं पवार म्हणाले होते.

 

 

 

Web Title: Dhananjay Munde's big statement regarding resignation of ministerial post, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.