देवेंद्र फडणवीसांनी जामनेरला घेतला राजकीय स्थितीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:56 IST2021-06-01T14:56:39+5:302021-06-01T14:56:47+5:30
Devendra Fadnavis: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी आमदारांनी मंगळवारी सकाळी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी भेट घेतली.

देवेंद्र फडणवीसांनी जामनेरला घेतला राजकीय स्थितीचा आढावा
जळगाव - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी आमदारांनी मंगळवारी सकाळी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा फडणवीस यांनी आढावा घेतला. सोमवारी रात्री दहाचे सुमारास फडणवीस यांचे जामनेरला आगमन झाले. नगराध्यक्ष साधना महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
वादळाने रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सकाळी सव्वा दहा वाजता फडणवीस व महाजन जामनेर येथून रवाना झाले. भाजप पदाधिकारी व नगरसेवक त्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्यांचेशी संवाद साधण्यासाठी थांबून होते, मात्र नंतर बोलू असे त्यांनी पत्रकारांना सांगितले व मुक्ताईनगरकडे निघून गेले. उशीर झाल्याने त्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली नाही. खासदार उन्मेष चव्हाण, आमदार राजू भोळे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्ष रंजना पाटील यांचेसह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.