शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:47 IST

देवेंद्र फडणवीस यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची असल्याची सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (devendra fadnavis says mns is not our enemy and react over bjp alliance)

मनसेसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मनसे शत्रूपक्ष नाही. पण, भाषेच्या संदर्भातील त्यांची भूमिका भाजपला मान्य नाही, असे सांगताना हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची आहे. अलीकडील काळात मनसेने तशी भूमिका घेतली आहे. मात्र, भाषेसंदर्भातील भूमिका मनसेने बदलली, तर विचार करता येऊ शकतो. पण, आताच्या घडीला मनसेसोबत युतीची कोणतीही चर्चा नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

“भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आहे. यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळतो. मात्र, त्यासाठी अंगावर जाणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाही. या घटनेची दखल घेतली गेली पाहिजे. वर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी आता आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुरावेळी जीआर बदलून मदत केली होती. तशीच मदत आता करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

“पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र

दरम्यान, सोलापूरमधून मराठवाड्याला पाणी कस नेता येईल याबाबत वर्ल्ड बँक सोबत बैठकीत प्रस्ताव होता. त्यावर सरकारने विचार करायला हवा. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा अजूनही पाण्याखाली असल्याचे समजले. आलमट्टी धरणातून ५ ते ६ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले. दुसरीकडे साखर कारखाने जगले पाहिजेत. ज्यांनी बुडवले त्यांना मदत द्यायची आणि बुडवणाऱ्यांना संधी का द्यायची, अशी विचारणा करत हे योग्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे