शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला; भाजपमधील वादात शिवसेनेची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 5:33 PM

फडणवीस-खडसे वादावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

जळगाव: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रातील एक ओबीसी नेता संपवला आहे. ग्रामीण भागातील ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी ते असेच प्रयत्न करत आहेत, अशी टीका सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी जळगावात फडणवीस यांच्यावर केली. खडसे विरुद्ध फडणवीस वादात त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत उडी घेतली आहे.

गुलाबराव पाटील हे सोमवारी दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रनौत, नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेली मारहाण अशा विषयांवर मते मांडत भाजपवर टीकास्त्र डागले. अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का?; खडसेंचा थेट सवाल

आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवेखडसेंच्या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते, पण पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे. खडसे यांच्या रुपाने फडणवीस यांनी आमच्या उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.व्हिडीओ क्लीप, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही?सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि कंगना प्रकरणावरून गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट घेणारा होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी उलगडल्या आहेत. असे असताना टीव्हीवर मात्र, चीनची बातमी दिसत नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. 52 टक्के रोजगार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.खडसेंनी घरातील धुणी रस्त्यावर आणू नये; फडणवीस यांनी सुनावले

उन्मेष पाटील यांना लाज वाटत असेल तर स्वतःला अटक करून घ्यावीमुंबईत नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली, याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील भाजपवर चांगलेच भडकले. ते म्हणाले, भाजप नाहक राजकारण करत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे सैनिकांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे दीड वर्षे निलंबित राहिले. भाजपचे हे काही पहिले प्रकरण नाही. हे बेशरम लोक आमच्यावर काय टीका करतील? यांची आमच्यावर टीका करण्याची लायकी नाही. भाजपचे तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी देखील एका माजी सैनिकाला मारहाण केली होती. परंतु, आजपर्यंत त्यांना अटक झालेली नाही. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून अटक करून घ्यावी. स्वतः सैनिकाला मारहाण करतात आणि नंतर टीव्हीसमोर येऊन शहाणपणा करतात. हे म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाँटे' असाच प्रकार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाGopinath Mundeगोपीनाथ मुंडेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत