काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, देवेंद्र फडणवीस यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 02:57 PM2021-05-20T14:57:38+5:302021-05-20T15:11:03+5:30

Tauktae Cyclone Devendra Fadnavis Bjp Ratnagiri : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. गतवर्षीच्या निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचेच झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis criticizes the Center for pointing the finger at anything that happens | काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, देवेंद्र फडणवीस यांची टीका

काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Next
ठळक मुद्देकाहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचंविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

खेड: राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. गतवर्षीच्या निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचेच झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. सकाळच्या सत्रात त्यांनी खेड तालुक्यातील बोरज येथे भेट दिली. यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, डॉ. विनय नातू, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना अजून पूर्ण मदत मिळालेली नाही. सलग दुसऱ्या वर्षी चक्रीवादळाचा दणका कोकणाला बसला आहे. कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे. किमान आता तरी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, असे ते म्हणाले. तालुक्यातील बोरज-घोसाळकर वाडी नजीक सोमवारी १७ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास वादळामुळे तुटलेल्या ३३ के व्ही विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने प्रकाश गोपाळराव घोसाळकर व वंदना प्रकाश घोसाळकर या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता.

फडणवीस यांनी आपल्या या दौऱ्यात घोसाळकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. राज्य सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या सदस्याला नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.

Web Title: Devendra Fadnavis criticizes the Center for pointing the finger at anything that happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.