“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 04:32 PM2021-07-15T16:32:03+5:302021-07-15T16:34:22+5:30

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून, बहुमत आहे, तर मग घाबरता कशाला, अशी विचारणा केली आहे.

devendra fadnavis criticized maha vikas aghadi over assembly speaker election | “मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस

“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देतुमच्याकडे बहुमत आहे, तर मग घाबरताय का?यांचा एकमेकांवरही विश्वास नाहीपंकजा मुंडेचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. मात्र, त्यात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा प्रस्तावच नसल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून, बहुमत आहे, तर मग घाबरता कशाला, अशी विचारणा केली आहे. (devendra fadnavis criticized maha vikas aghadi over assembly speaker election)

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत. ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे बहुमत आहे, तर मग घाबरताय का? हात वर करुन निवड कशासाठी? मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

“आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं”

यांचा एकमेकांवरही विश्वास नाही

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा एकमेकांवरही विश्वास नाही आणि आपल्या आमदारांवर देखील विश्वास नाही, असा टोला लगावत नाना पटोले बोलतात, त्यानंतर शरद पवार मत व्यक्त करतात. त्यानंतर काही लोक नाना पटोले यांना न घेताच पवाराची भेट घेतात. यातून सर्व काही कळते, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.  

देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

पंकजा मुंडेचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही

पंकजा मुंडे यांचे भाषण ऐकले का, या प्रश्नावर उत्तर देताना, पंकजा मुंडेचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासेही केलेत. त्यावर आता मी बोलण्यात काही अर्थ नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुकेश अंबानी ‘ही’ कंपनी खरेदी करणार; ३ कोटी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेगा प्लान

दरम्यान, आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वजनानेच कोसळणार आहे. ते आज कोसळेल की उद्या कोसळेल हे मी सांगितलेले नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी आम्ही राज्याला पर्यायी सरकार देऊ, असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 
 

Web Title: devendra fadnavis criticized maha vikas aghadi over assembly speaker election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.