शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

"मला पाडून दाखवा"; अजित पवारांचं सुधीर मुनगंटीवारांना खुलं आव्हान

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 15:57 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांना जशासतसं प्रत्युत्तर दिलं. 

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीमुनगंटीवारांना अजित पवारांनी दिलं खुलं आव्हाननिवडणुकीत मला पाडून दाखवाच, अजित पवारांचं थेट आव्हान

मुंबईराज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनमध्ये यावेळी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. "माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा जिंकू शकत नाही", असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार सभागृहात त्यांच्या भाषणावेळी होत असलेल्या अडथळ्यावेळी म्हणाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांना जशासतसं प्रत्युत्तर दिलं. 

"तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा", असं रोखठोक उत्तर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना दिलं. सुधीर मुनगंटीवार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव, पुरवणी मागण्या, कोरोनातील व्यवस्थापन अशा विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मुनगंटीवार यांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. त्यावर "माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधीच जिंकत नाही", असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर देत "तुमचं आव्हान मी स्विकारतो, मला पाडून दाखवाच", असं म्हणून मुनगंटीवारांना निरुत्तर केलं.  

मुनगंटीवार-अनिल परब आमने-सामनेहक्कभंग प्रस्तावाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवेसना सभागृहात आमने-सामने आले होते. विशेष हक्कभंगाच्या प्रस्तावावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी वैयक्तिक टीका-टिप्पणी केल्यास हक्कभंग कसा होऊ शकतो? असा सवाल उपस्थित केला. त्यावर अनिल परब यांनी आमदारांना विशेष अधिकार दिलेत कशाला? तुम्ही कधी हक्कभंग वापरले नाहीत का? मागील ५ वर्षात किती हक्कभंग मांडले हे दाखवू का? सभागृह असताना कोर्टात जायचं कशाला? अशा प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा