शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सिद्धूबाबतच्या त्या निर्णयामुळे वाद अधिकच पेटला, पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:56 IST

Punjab Congress News: पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

नवी दिल्ली - पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज पंजाबमधील वाद मिटवण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद कायम ठेवून नवज्योत सिंग सिद्धूंकडे पंबाज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आले होते. या निर्णयाबाबत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सिद्धू यांच्या समर्थकांचा गट अधिकच सावध झाला आहे. (That decision about Sidhu further fueled controversy, with the Congress on the verge of splitting in Punjab)

आता नवज्योत सिंग सिद्धूंकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यापूर्वी पंजाब काँग्रेस दोन गटात विभाजित होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. जर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यापासून रोखण्याच्या प्रयत्न केल्यास पुढील रणनीती काय असावी, याबाबत सिद्धूंच्या गटाकडून तयारी केली जात आहे.

चंदिगडमध्ये सिद्धू यांच्यासोबत पाच मंत्री आणि सुमारे १० आमदारांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. चंदिगडमधील सेक्टर ३९ मधील पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि कॅप्टनविरोधी गटातील नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या घरी ही बैठक झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दबावाखाली येत पक्षश्रेष्ठींनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले नाही तर अशा परिस्थितीच पुढील रणनीती आखली जात आहे. स्वत: नवज्योत सिंग सिद्धू या बैठकीत सहभागी झाले होते.  दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही मोहालीमध्यील सिसवां येथील आपल्या फार्म हाऊसवर जवळचे आमदार आणि मंत्री व खासदारांसह आपातकालीन बैठक बोलावली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाब