शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Coronavirus: मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 16:07 IST

नाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचं कारण नाही. हा अन्याय दूर करुन सरकारने त्यांना नियम व अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

ठळक मुद्देनाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचं कारण नाही.ज्या कोकणातील माणसांनी तुमच्यावर भरभरुन प्रेम केले त्यांच्यावर मेहेरबानी कराभाजपा आमदार प्रसाद लाड यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई – राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ८ जूनपासून सरकारने अनलॉक १ सुरु करुन पुन्हा एकदा जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने दुकानं, हॉटेल्स उघडली आहेत पण राज्यातील सलून पार्लर बंद असल्याने नाभिक समाजावर अन्याय होत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज टापटीप राहतात, ते नेमकं कुठे दाढी केस कापतात हा प्रश्नच आहे असा खोचक टोला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

अनलॉक १ मध्ये अनेक निर्बंध शिथिल केले असताना सलून बंद ठेवण्यात आले आहेत, नाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचं कारण नाही. हा अन्याय दूर करुन सरकारने त्यांना नियम व अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात सुरुवात झाली आहे. मग नाभिक समाजालाही कोविड १९ चे नियम सांभाळून त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी असं ते म्हणाले.

तर कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, राज्य सरकारने तात्पुरती जी मदत दिली ती तोकडी आहे. कोकणावर शिवसेनेने कायम प्रेम केले, त्यामुळे किमान ५०० कोटी रत्नागिरीला, ८०० कोटी रायगडला तर सिंधुदुर्गाला १०० कोटींची मदत करण्यात यावी, ज्या कोकणातील माणसांनी तुमच्यावर भरभरुन प्रेम केले त्यांच्यावर मेहेरबानी करा, मच्छिमारांसाठी वेगळं पॅकेज जाहीर करावी अशा विविध मागण्या आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारकडे केली.

दरम्यान, मच्छिमार करणारे कोळी समाज हा मुंबईचा आत्मा आहे, त्यांना उभारी देण्यासाठी प्रयत्न करा, शैक्षणिक, पर्यटन व्यवसायासाठी मदत करावी, याबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आलं आहे. कोविड १९ ची लॅब रत्नागिरीत व्हावी अशी मागणी आम्ही केली, त्यानंतर ३ महिन्यांनी सरकारला जाग आली, जर या सरकारने आमची भूमिका मान्य केली नाही तर जनतेसाठी, कोकणासाठी आम्ही राज्य सरकारशी दोन हात करण्याचीही तयारी केली आहे असा इशारा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला.  

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?

...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल

कोरोनाची वाढती संख्या पाहता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन, काय आहेत नियम?

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPrasad Ladप्रसाद लाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळkonkanकोकणShiv Senaशिवसेना